कर्जत तालुका किसान मोर्चा अध्यक्ष भाजपा गणेश चंद्रभान जंजीरे यांनी घेतली तालुक्यातील शेतकऱ्यांची दखल खरीप हंगामात खत , बियाणे , कीटकनाशक औषधे मुबलक व योग्य दरात मिळण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्याशी केली चर्चा 

Google search engine

 

कर्जत तालुक्यात यंदा मॉन्सूनची दमदार सुरूवात झाली 

आहे. बी-बियाणे, खते, बियाणांची चढ्या दराने विक्री व खतांच्या कृत्रिम टंचाईबाबत कर्जत तालुका किसान मोर्चा अध्यक्ष भाजपा गणेश चंद्रभान जंजीरे यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी चर्चेत खतांची-बियाणांची कृत्रिम टंचाई आणि आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाया करून विक्रेत्यांचे परवाने रद्द करणार असल्याचे यावेळी गटविकास अधिकारी म्हणाले. तर असे प्रकार रोखण्यासाठी शासन स्तरावर टास्क फोर्स नेमून सुयोग्य नियोजन करावे. यंदाच्या खरीप हंगामात महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी शेतकऱ्यांना मुबलक व शासन नियमाप्रमाणे योग्य दरात मिळावेत असे गणेश चंद्रभान जंजीरे म्हणाले.