साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथे राष्ट्रीय वाचन दिन साजरा

Google search engine

 

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न, साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथे आज दि.१९ जुन हा दिवस ग्रंथालय चळवळीचे जनक पी.एन. पैनिकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भारत सरकार यांच्या निर्देशनानुसार राष्ट्रीय वाचन दिन म्हणून साजरा करण्यात आला . यावेळी साईकृपा कृषि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिमा पुजनानंतर कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी साईकृपा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर यांची निवड करण्यात आले. यावेळी तृतीय वर्षातील विद्यार्थी पुंडल भोरे याने प्रास्ताविक मध्ये आजच्या दिवसाचे महत्व व कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.

मान्यवरांच्या मनोगत मध्ये. प्रा. पाठक सर यांनी विद्यार्थींचे वाचन कमी झाल्याने निर्माण झालेले दुष्परिणाम व त्यावर केले जाणारे उपाययोजना स्पष्ठ केल्या. यावेळी प्रा. दळवी सर, प्रा. पगार सर तसेच प्राध्यापिका खंडागळे मॅडम यांनीही आजच्या दिनाबद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत मध्ये साईकृपा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर यांनी समाजाच्या अनौपचारिक जडणघडण तसेच एक सुसंस्कृत नागरिक निर्माण करण्याच्या कार्यामध्ये ग्रंथालयाचे असलेले योगदान स्पष्ट केले. आभार प्रदर्शन कु. श्रावणी मासाळ या विद्यार्थीनीने केले.

या कार्यक्रमासाठी दत्तकृपा शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव सौ. अर्चनाताई पानसरे मॅडम व रजिस्टार श्री. कल्याण शिंदे सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.