
मा.श्री.दत्तात्रय लक्ष्मण भाकरे यांच्या 61 व्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त देशमुखवाडी येथे मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी सायंकाळी 09.00 ते 11.00 यावेळेत समाज प्रबोधनकार ह. भ. प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे. मा. श्री.दत्तात्रय भाकरे यांच्या डायलिसिसला सहा वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या वडिलांच्या सेवेत तात्यासाहेब भाकरे व प्रवीण भाकरे यांच्यासह संपूर्ण भाकरे कुटुंबीयांनी सामावून घेतले आहे. त्यांच्या सेवेत ही कीर्तन सेवा पार पडणार आहे.
या कीर्तनसेवेस गाणकोकिळा संगीतरत्न ह. भ. प.किरण महाराज शेटे , स्वर गंधर्व ह. भ. प.सुनील महाराज पवार , संगीत अलंकार ह. भ. प.संजय महाराज हजारे , संगीतरत्न ह. भ. प.संपत महाराज दानवे , मृदुंग मार्तंड ह. भ. प.कृष्णा महाराज भोरकडे आदी सेवा देणार आहेत
या कीर्तनसेवेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.तात्यासाहेब भाकरे , प्रवीण भाकरे व समस्त भाकरे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.






