श्री. जगदंबा विद्यालय, राशीन येथील दहावीच्या सन 2005-06 च्या बॅचचा विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न 

Google search engine

 

 

रयत शिक्षण संस्थेच्या श्री जगदंबा विद्यालय, राशीन येथील इ. दहावीच्या सन 2005-06च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जिजाऊ मंगल कार्यालय, राशीन येथे उत्साहात संपन्न झाला.

या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने या युवकांनी जुन्या आठवणींना उजाळा देतानाच एक आगळावेगळा पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजासमोर एक नवीन उदाहरण मांडले आहे.या स्नेह मेळाव्यामध्ये सर्व सहभागी मित्रांना प्रगती नर्सरीच्या सहकार्याने पेरूचे रोप भेट देण्यात आले. या नवीन उपक्रमामुळे पर्यावरणाचा संदेश तर मिळालाच पण निसर्गाशी नाते घट्टही झाले.

 

कार्यक्रमात त्या काळात मार्गदर्शन करणारे माननीय कानगुडे सर, दळवी सर, देशमुख सर, जोगदंड सर, त्र्यंबके मॅडम, पवार सर आणि सय्यद मॅडम यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांनी अश्रू अनावर झाले होते.

सय्यद सर वैयक्तिक कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून भावनिक उपस्थिती दर्शवली.

प्रगती नर्सरीचे संचालक श्री. शरद तनपुरे यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत सांगितले, “वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली असून आजची तरुण पिढी निसर्गाबद्दल जागरूक होत आहे हे अत्यंत आनंददायी आहे.”

 

स्नेह मेळावा हा क्षण म्हणजे आठवणी थोड्या असतात, पण त्या क्षणांना जर झाडाच्या रूपाने आठवण दिली गेली, तर ती आठवणही वाढते आणि निसर्गसेवाही होते असे मत अनेक युवकांनी व्यक्त केले.

हा उपक्रम केवळ एक स्नेहमेळावा नसून, निसर्गाशी मैत्री जोडणारी एक चळवळ ठरावी अशीच अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

हा स्नेह मेळावा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन मासाळ, नितीन साळवे, अमोल गावडे, वैभव धोडे, जहिर मणेरी, मुन्ना मुडे, अफजल तांबोळी, प्रशांत दळवी. या सर्व मित्रांनी केवळ सहकार्यच केले नाही तर संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडून एकत्रितपणाचा एक आदर्श घालून दिला आहे .