
राक्षसवाडी येथील ग्रा प कर्मचारी कै दादासाहेब झुंबर श्रीराम हे पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते त्यांचा मृत्यू दि . २१/०२/२०२१ रोजी कोविड काळात झाला होता .
कोविड काळात स्थानिक स्वराज्य संस्था मधील कर्मचारी यांना कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयाचे विमा कवच / सानुग्रह अनुदान देण्यात येत होते त्याप्रमाणे कै . दादासाहेब झुंबर श्रीराम यांचा प्रस्ताव जि प . अहिल्या नगर कडून पाठवणेत आला होता परंतु आज पावेतो त्यांना न्याय मिळाला नव्हता .
कै .दादासाहेब यांचे चिरंजीव सौरभ श्रीराम यांनी नामदार प्रा राम शिंदे साहेब यांना यासंदर्भात निवेदन दिले . नामदार शिंदे साहेबांनी संवेदनशीलता दाखवत ग्रामविकास मंत्रालय आणि ग्राम विकास मंत्री श्री जय कुमार गोरे यांच्या माध्यमातून या प्रश्नाला न्याय दिला .
कोविड १९ मधील कर्तव्य बजावत असताना विमा कवच / सानुग्रह अनुदान देण्याबाबत २०२४/२५ अर्थसंकल्पीय तरतूदीतून ५० लाख रु . ची देयके सादर करून योग्य त्या कागद पत्राची पूर्तता करण्यची जबाबदारी मुख्य कार्यकारी जि प . अहिल्या नगर यांची निश्चित करून आदेश काढण्यात आला .
नामदार प्रा.राम शिंदे साहेब यांच्यातील संवेदनशीलता आणि अंत्योदय लाभार्थी प्रती असलेली वचनबद्धता दिसून येते .
यासाठी शांतीलाल कोपनर माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच शिवाजी कारंडे कर्जत तालुका उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी व श्री जयसिंग देवकाते युवक कार्यकर्ते यांनी माननीय नामदार श्री राम शिंदे साहेब विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठपुरावा केल्याने यश आले.






