
श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या संशोधन केंद्रातून मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ रोजी रसायनशास्त्र विभागातील अध्यापक प्रा.विलास सुद्रिक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. डिग्री प्राप्त झाली. त्यांना माजी विभागप्रमुख व पी.एच.डी. मार्गदर्शक डॉ.शामराव लवांडे तसेच को-गाईड डॉ. ज्ञानेश्वर कर्पे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले. या कामी त्यांना एस.पी. कॉलेज, पुणे येथील प्राध्यापक डॉ.प्रवीण म्हस्के व महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.मनोहर सुर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. याबद्दल त्यांचे अनेक स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
त्यांनी “कंपवात, अपस्मार आणि विषाणू प्रतिबंधक औषधे कृत्रिमरित्या तयार करण्याची नवीन पद्धत” या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबंध सादर केला. ऑनलाईन सादरीकरण करता बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील डॉ. प्रशांत अनभुले आणि चेअरमन म्हणून पुणे विद्यापीठातील डॉ.सुरेश वाघमोडे यांनी काम पाहिले. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील संशोधन केंद्रातून एकूण ७ विद्यार्थी पी.एच.डी. उत्तीर्ण झाले असून ७ विद्यार्थी संशोधनाचे काम करत आहेत.
प्रा.विलास सुद्रिक हे मुळचे कर्जत तालुक्यातील कोपर्डी या गावचे रहिवाशी असून, एका शेतकरी कुटुंबातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहिल्यानगर येथील न्यु आर्ट्स कॉलेजमधून त्यांनी एम.एस्सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. २०१० ते २०१४ दरम्यान त्यांनी मुंबई येथील कॅलिक्स फार्मा लि. या नामांकित औषध कंपनीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात काम केले. दरम्यान २०१२ मध्ये राष्ट्रीय पातळीवरची नेट परीक्षा उत्तीर्ण केली. जानेवारी २०१५ पासून त्यांनी श्रीगोंदा येथील छत्रपती महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात अद्यापनास सुरुवात केली. अध्यापनासोबत ते अनेक पदांवर काम करत आहेत. प्लेसमेंट सेल अधिकारी तसेच महाविद्यालयीन करिअर कट्टा समन्वयक म्हणून काम पहात आहेत. रसायनशास्त्र विषयाचे ७ शोधनिबंध प्रकाशित झाले असुन, ४ पेटंट मध्ये सहभाग, राज्य स्तरावरील ३ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड,सर्व विश्वस्त, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, रसायनशास्त्र विभागातील व कॉलेजमधील सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले.







