उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सोडलेले आवर्तन तात्काळ बंद करा ,  कर्जतमधील धरणग्रस्त शेतकऱ्यांचा आवर्तनास तीव्र विरोध 

Google search engine

उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील लाभक्षेत्रासाठी ८० दिवसांचे आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनास कर्जतमधील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. आवर्तन तात्काळ बंद न केल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर युवराज हाके, लालासाहेब काळे, नानासाहेब झगडे, अशोक खिलारे, शिवाजी काळे, दत्तात्रय विंड, रामदास तांदळे, तानाजी साळुंखे, लाला गावडे, अण्णासाहेब ननवरे, आबासाहेब मदने, रमेश मेहर, सतीश मोरे, संजीवन मोरे, विजयकुमार कायगुडे, तात्या कायगुडे, राजेंद्र खताळ, पद्माकर काळे, हनुमंत गावडे, दीपक लोंढे, ओम प्रकाश गोसावी, रामचंद्र खराडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

उजनी धरण माढा जिल्हा . सोलापूर तालुक्यात आहे. पुणे, सोलापूर व अहिल्यानगर या तीन्ही जिल्ह्यांतील भीमा नदी शेतकऱ्यांना वरदान लाभलेले आहे. कर्जतमधील शेतकऱ्यांच्या जमिनी उजनीच्या फुगवट्याच्या पाण्यात गेल्या आहेत. नदीलगतची गावे पावसाळ्यात पुराचा धोका सहन करतात. काही गावांचे स्थलांतर करण्यात आले. मात्र उन्हाळ्यात याच गावांना उजनीतून पाणी सोडल्यानंतर पाणी टंचाई जाणवते. गेल्यावर्षी कर्जतमधील भीमा नदीपात्र संपूर्ण कोरडे पडले होते. त्यामुळे पाण्याअभावी उभी पिके जळाली. यावर्षीही तीच परिस्थिती होणार असून उजनीमधून आवर्तन सोडल्याने नदीतील पाणी पातळी झपाट्याने खाली जात आहे. आवर्तन बंद केले नाहीतर पुन्हा एकदा भीमा नदीपात्र कोरडे पडेल याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. भीमा नदी पात्र कोरडेठाक पडल्यावर उभ्या पिकांची राख रांगोळी झाल्यास यास जबाबाबर कोण असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला. आम्ही उजनीचे मूळ धरणग्रस्त आहोत. सोलापूरसाठी पाणी सोडताना कर्जतचा विचार केला जात नाही. फळबाग, उभी पिके , पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे भीमा नदीपात्रात कर्जतमध्ये बुडीत बंधारा व्हावा अशीही मागणी केली आहे. तहसीलदार गुरू बिराजदार यांनी वरिष्ठ कार्यालयास तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले.