
गेल्या कित्येक दिवसांपासून नियमित सुरू असणारी कापरेवाडी एसटी बस बंद असल्याने कापरेवाडी व पाटेवाडी, निमगाव डाकू , शेजारील गावच्या विद्यार्थी, महिला व वृद्धांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी दिपक ( भाऊ )शिंदे तालुकाध्यक्ष , विद्यार्थी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता.कर्जत यांनी केली आहे.
बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कापरे वाडी , हंडाळवाडी आदी गावांमधील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
सध्या परीक्षेचा हंगाम सुरू आहे, तसेच महाविद्यालयाच्या परीक्षा एप्रिल , मे महिन्यापर्यंत असणार आहेत. इयत्ता बारावीचे जादा तास सुरू आहेत. या एसटी बसमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वेळेत पोचणे अवघड होत आहे, तसेच संध्याकाळी उशिरापर्यंत पर्यायी गाडीची बघत ताटकळत थांबावे लागत आहे.
विद्यार्थी, पालक व नागरिकांतून तीव्र संताप व नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गावर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सोय परिवहन मंडळाने करावी, अशी मागणी दिपक भाऊ शिंदे , तालुकाध्यक्ष , विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केली आहे.






