श्रेयवादाच्या नुरा कुस्ती आखाड्यात शिष्टाचाराचा रडीचा डाव आ .पवारांनी खेळू नये त्याने काहीही साध्य होणार नाही : शेखर खरमरे

Google search engine

 

 

कर्जत जामखेडचे आमदार पवार यांनी विधान परिषद सभापती विधान परिषद सभापती ना.प्रा.राम शिंदे यांनी शिष्टाचार पाळावा नाहीतर त्यांना तो विधान सभा अध्यक्षांनी पाळायला लावावा अशी टीका विनाकारच कोणतेही औचित्य नसताना केली .

सतत संविधानाचा दाखला आमदार रोहीत पवार महोदय देत असतात मग शिष्टाचारा प्रमाणे राज्यपालानंतर विधान परिषद सभापती पद येते, मग शिष्टाचारा प्रमाणे म्हटल्यास त्यांना विधान परिषद अध्यक्ष कसे सांगू शकतील? एवढा शिष्टाचाराचा पुळका येणाऱ्या आ . पवार यांना हा छोटासा शिष्टाचार माहीत नाही काय ?

आमदार महोदय यांचे दुखणे वेगळेच आहे . नामदार प्रा राम शिंदे यांना सभापती पद मिळाले म्हणजे त्यांचे राजकीय पुर्नवसन न होता तो राजकीय विजनवासच आहे त्यामुळे मतदार संघाची त्यांची नाळ तुटेल असे आमदार महोदयाना वाटत होते परंतु इथे तर उलट झाले आहे . नामदार प्रा राम शिंदे साहेब हे सतत मतदार संघातील प्रश्नांसाठी प्रयत्नशील आहेत . मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क आहे .त्यामुळे त्यांची मळमळ वाढली आहे . अचानक शिष्टाचाराचा कढ येण्याचे हेच कारण आहे .

संवैधानिक पद असले तरी जनतेच्या प्रती आपण उत्तरदायी आहोत हे नामदार प्रा.राम शिंदे साहेब यांनी पहिल्याच पक्षाच्या सदस्य नोदणी अभियान कार्यकमात सांगितले होते . आणि त्या प्रमाणे ते लोकांभिमुख भूमिका घेऊन मतदार संघातील विविध प्रश्न मार्गी लावत आहेत .

निवडणूक काळात ढिगभर मंत्री पदाच्या पाट्या हे आमदार पवार साहेब घेऊन मिरवत होते आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्नांवर एक एक मंत्रीपद घेत होते शेवटी ते मुख्यमंत्री ही होणार होते?? त्यावेळी शिष्टाचार आठवला नाही काय? एमआयडीसीच्या प्रश्नावर ते उद्योगमंत्री होऊन एमआयडीसीची उद्घाटनाची फित कापनार होते . तो प्रश्न मार्गी लागला आहे . थोड्याच दिवसात त्याला मूर्त रुप येणार आहे . आमदार महोदयांना मध्यंतरी सत्तेत ही जायचे होते . ते गोड बातमी देणार म्हणून त्यांचे कार्यकर्ते आधीच गुडघ्याला बाशिंग बांधत होते .

परंतु यातील काहीच घडले नाही उलट मी शप गटातच नाराज आहे अशा बातम्या त्यांना प्रसार माध्यमात पेराव्या लागल्या तरीही जयंत पाटील काही भाव देत नाहीत . अशी त्यांची राजकीय अडचण झाल्यामुळे आता कमीत कमी सभापतींवर टिका करून प्रकाश झोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न शिष्टाचाराच्या नावाने कोंबडा आरवून केला जात आहे .

आ .पवार यांनी सभापती प्रा राम शिंदे साहेबांना कर्जत येथील कुस्तीचे आमंत्रण विधान भवनाच्या आवारात दिले तरी सभापती महोदय यांनी कोणताही शिष्टाचाराचा अवडंबर न करता ते स्विकारले त्यावेळी तेच आमंत्रण त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन रितसर दिले असते तर शिष्टाचार पाळला गेला असता असे आमदार महोदयांना वाटत नाही का ?

नामदार प्रा . राम शिंदे यांनी या संवैधानिक पदावर राहून ही आपण जनतेप्रती ही लोक प्रतिनिधी म्हणून उत्तरदायी आहोत आणि लोकांच्या प्रश्नांबरोबर लोकाबरोबरच राहणार ही भूमिका घेतल्याने आ .पवार यांची राजकीय कोंडी झाल्याने व स्व :पक्षातही फारसे विचारत घेतले जात नसल्याने उद्विग्न होऊन माझ्यामुळेच सभापती पद मिळाले? अशा आशयाची दर्पोक्ती ही ते करतात . त्यांची उद्विग्नता आणि मानसिकता किती ढासळली आहे यामधून स्पष्ट होते त्यामुळे त्यांना शिष्टाचाराचा उमाळा आला आहे अशी टिका भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी केली आहे .