
तडफदार नवा धडाडीचा नेता, नुसत्या कर्जत तालुक्याच्याच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यालाही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठा नावलौकिक असणारे कोरेगावचे फाळके पाटील या लक्षवेधी राजकीय घराण्यातील तरुण तडफदार आदर्श युवक श्री. जयवंतराव शिवाजीराव उर्फ दादासाहेब फाळके पाटील यांचा आज वाढदिवस , त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
तालुक्याच्या, जिल्ह्याच्या आणि राज्याच्याही राजकीय पार्श्वभूमीवर दादासाहेब फाळके यांच्यासारख्या तडफदार नेतृत्व गुणी, आदर्श युवकाची राज्यकर्ता म्हणून सर्वसामान्य जनतेला खरी गरज निर्माण झालेली आहे. ही गोष्ट विचारपूर्वक लक्षात घेऊन त्यावर प्रत्येकाने चिंतन करण्याची गरज आहे.
दोन, सृजनशिल मनांच्या खऱ्या मैत्रीला गरीबी, श्रीमंती, जात, धर्म किंवा त्याच्या वयाचीही मर्यादा अडवू शकत नसते; हे मला आमचे तरूण जिवलग मित्र दादासाहेब फाळके पाटील दादासाहेबांचे चुलते, कर्जत तालुक्याचे एक अभ्यासू तडफदार राजकीय नेते मा. राजेंद्र तात्या फाळके यांचा मी एक निष्ठावंत कार्यकर्ता, त्या निमित्ताने नकळत जुळलेले ऋणानुबंध त्यांच्या नव्या पिढीनेही जपण्याचा केलेला प्रयत्न, दादासाहेबांच्या विचार आचारातून प्रकट होत असतो; आणि एकांतात असतानाही कधीकधी त्याच विचार मंथनात आणि चिंतनात मी स्वतःला हारवून जातो… कर्जत तालुक्यातील कोरेगावच्या फाळके पाटील या खानदानी सधन शेतकरी कुटूंबाला पिढीजात, जी राजकीय, सामाजिक प्रतिष्ठेची पार्श्वभूमी आहे; ती या कुटूंबातील नव्या पिढीनं ही मोठया जबाबादारीने सांभाळली आहे.
अशा या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा , तुम जियो हजारो साल, साल के दीन हो पचास हजार







