सेंद्रिय शेती काळाची गरज : बापूसाहेब होले

Google search engine

 

 

पीक उत्पन्न वाढविण्यासाठी रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर वापरले जातात त्यामुळे शेतीची सुपीकता कमी झाली आहे. शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी मातीचा कब्ज वाढविणे गरजेचे आहे त्यासाठी शेणखत खूप फायदेशीर ठरते. त्याचबरोबर जीवामृत सारखे प्रयोग करून शेण गोमूत्र आपल्या शेतात जाणे गरजेचे आहे. यशोदानंद गोशाळा वर्धापन दिनानिमित्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती विषयी एक दिवसीय कार्यशाळेच्या कार्यक्रमात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बापूसाहेब होले बोलत होते.

यशोदानंद गोशाळेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारित करण्यात येते. गोशाळेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. परीटवाडी येथे महादेव जाधव व पाटेगाव येथील महेश शेवाळे या दोन शेतकऱ्यांना या वर्षी सन्मानित करण्यात आले.

बॅक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र यांच्या वतीने माती परीक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करून माती परीक्षण फक्त 50 रू मध्ये उपलब्ध करून दिले.सोबतच शेतकऱ्यांना मुरघास बनविण्यासाठी 2 बॅग उपलब्ध करून देणार असल्याचे बॅक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्राचे प्रतिनिधी देवा फलफले यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी स्वतःचे खत स्वतः बनवले पाहिजे. त्यासाठी फक्त शेण, गोमूत्र, बेसन, गूळ असे घटक वापरले तर खत तयार होते.रासायनिक खतावर लागणारा खर्च कमी होईल व स्वतः खत तयार केले तर खर्च कमी होऊन शेतकऱ्याची उन्नती होऊ शकते. असे त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.

या कार्यक्रमासाठीआवर्जून उपस्थित असलेले शेतकरी संघटनेचे नेते आबासाहेब काळे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सेंद्रिय शेती बाबत समस्या विचारत मान्यवराचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष मिलींद राऊत यांनी केले तर आभार महात्मा फुले संघटनेचे अध्यक्ष कुंडलिक सायकर यांनी मानले. सूत्रसंचालक किशोर जाधव यांनी केले.