अळसुंदे हायस्कूलमध्ये इंटरऍक्टिव्ह डिजिटल बोर्ड द्वारे अत्याधुनिक पद्धतींचा अध्यापनात वापर

Google search engine

 

 

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षण प्रक्रियेमध्ये होऊ घातलेल्या अमुलाग्र बदलला सामोरे जाताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नवनवीन तंत्रांचा वापर करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार आज गुरुवार दिनांक 6 मार्च 2025 रोजी न्यू इंग्लिश स्कूल आळसुंदे विद्यालयात लॉजिक कंपनीचे इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात 75 इंची तीन इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड बसविण्यात आले.

या इंटर ऍक्टिव्ह डिजिटल बोर्डच्या माध्यमातून पारंपारिक खडू फळा पद्धती ऐवजी या टच स्क्रीन असणाऱ्या बोर्डवरच लेखन करून त्यासोबत विषयानुरूप आवश्यक असणाऱ्या आकृत्या, आलेख आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्राप्त होणारी

संबंधित माहिती सहजगत्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपयोग होत असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर व्ही परहर यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील उत्कृष्ट संस्कार केंद्र म्हणून नावारूपास येत असलेल्या विद्यालयात या आधुनिक सुविधा असाव्यात यासाठी मुख्याध्यापक आर व्ही परहर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक मोहन बनसुडे, सुनील गोरखे, प्रवीण कांबळे, रवींद्र विधाते आणि कनिष्ठ लिपिक सुरेश कुमार देशमुख कार्यरत आहेत.

ज्ञानरचनावादी व मनोरंजक पद्धतीने अध्ययन अध्यापन प्रक्रिया विद्यालयात सुरू असल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला व अळसुंदे देमनवाडी पंचक्रोशीतील सर्व पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांनी विद्यालयाचे कौतुक केले.