
श्री दत्तकृपा शिक्षण शास्त्र व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित, शिक्षणशास्त्र महाविद्यालय घारगाव येथील विद्यार्थ्यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी देवस्थान मळगंगा निघोज व रांजणखळगे या ठिकाणी भौगोलिक क्षेत्रभेट आणि वृक्षारोपण कार्यक्रम राबवले. तसेच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश विद्यार्थ्यांनी देऊन पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले व ते स्वतःपासून सुरुवात करण्याचे ठरविले.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचे महत्त्व लोकांसमोर मांडले. वृक्षारोपण करताना त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण केली. विद्यार्थ्यांनी स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना वृक्षांचे महत्त्व आणि पर्यावरणासाठी केलेल्या या प्रयत्नांचा लाभ समजावून सांगितला.
महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. गोंटे एम.आर,सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. विद्यार्थ्यांच्या कार्याची स्थानिक समाजाने प्रशंसा केली आणि पर्यावरणीय संरक्षणासाठी असलेला हा महत्त्वपूर्ण संदेश सुद्धा त्यांनी स्वीकारला.
या क्षेत्रभेटीच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली आणि भविष्यात पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी कसा सक्रिय सहभाग घेतला जाऊ शकतो, यावर विचार विनिमय केला.
श्री दत्तकृपा शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समाजातील लोकांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण आदर्श दिला आहे.






