
तालुकास्तरीय स्पर्धेत पार पडलेल्या कथाकथन स्पर्धेत औदुंबर सचिन जंबे इयत्ता पाचवी व तसेच लांब उंडी स्पर्धेत चौथीचा विद्यार्थी आर्यन संजय काळे हे तालुक्यात प्रथम आले. या यशाबद्दल दोघांचे मुख्याध्यापक रामचंद्र राजापुरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय काळे व सरपंच इंदूमती देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले. या दोघांना बाळासाहेब शिंदे, राजेंद्र माळवदकर, अनिल मंडलिक, दत्तात्रय गदादे, अनिल साळवे, सविता शेलार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.






