


महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कर्जत तालुका अध्यक्षपदी विजय कांतीलाल शिंदे व तालुका सचिव पदी सुनील अरुण कोकरे यांची निवड एकमताने करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन र.जि.४५११ कर्जत तालुकास्तरीय ग्रामपंचायत कर्मचारी मेळावा कर्जत पंचायत समिती सभागृह कर्जत येथे रविवार दि.१९ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर मा. दिलीपराव डिके साहेब व नाशिक विभागीय सचिव तथा जिल्हा सचिव मा. आत्माराम घुणे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश ईधाटे व जिल्हा संघटक मनेश वैराळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली . तसेच कर्जत तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कार्यकारिणी निवड करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे
मा. श्री विजय कांतीलाल शिंदे अध्यक्ष , मा. सुनील अरुण कोकरे सचिव , मा. सदाशिव बाप्पू डमरे , उपाध्यक्ष , मा. गणेश आखाडे , उपाध्यक्ष मा. संदीप नवले , संघटक , मा. रवींद्र दंडे , कार्याध्यक्ष मा. श्रीराम शिंदे , जिल्हा प्रतिनिधी , मा. परशुराम मच्छिंद्र भोगे , सहसचिव , मा. बाळासाहेब चव्हाण , सदस्य , उत्कर्षा शिंदे , महिला प्रतिनिधी , मा. अक्षय काळे , सदस्य , मा. दयानंद आढाव , सदस्य
यावेळी सर्वांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पारनेर तालुका अध्यक्ष शब्बीर शेख युनियनचे मार्गदर्शक ग्रामपंचायत अधिकारी जगताप भाऊसाहेब, ग्रामपंचायत अधिकारी मनोज घालमे, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी धांडे, सहाय्यक अभियंता प्रदीप काळे, पशुधन पर्यवेक्षक संतोष गदादे, जामखेड तालुका सचिव नानासाहेब साठे, जामखेड तालुका उपाध्यक्ष त्रिंबक पाचारणे तसेच कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .






