
प्रतिनिधी :- प्रा.राजेंद्र खराडे
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील शंभूराजे पब्लिक स्कूल मध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सण २०२४ – २०२५ चा पालक मेळावा शनिवारी मोठया उत्साहात संपन्न झाला.या पालक मेळाव्यामध्ये पालकांनी सुरुवातीला आपल्या मुलामुलीचे प्रगती पुस्तक व त्यांचे पेपर पाहून त्यांच्या प्रगतीबाबत शिक्षकांशी संवाद साधला.त्यानंतर पालक सभा सुरु झाली.पालक सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धटेकच्या सरपंच लताताई सांगळे होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे ज्येष्ठ नागरिक बंडाभाऊ मोरे व कर्जत तालुका विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश सुद्रिक,शालेय व्यवस्थापन अध्यक्ष संतोष कायगुडे तर उपाध्यक्ष महेश चव्हाण होते.पालक सभेमध्ये प्रथम शिक्षकांनी आपला परिचय करून देत आपले मनोगत व्यक्त केले तसेच मान्यवरांनीही शाळेविषयी आपली मनोगते व्यक्त केली.त्यानंतर पालकांनी आपल्या मुलामुलींच्या प्रगतीबाबत व शालेय व्यवस्थापनाबाबतही खूप वेळ चर्चा केली व सभेमध्ये पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे अध्यक्ष गोडसे सर यांनी अपेक्षित अशी उत्तरे दिली व पालक सभा मोठया खेळीमेळीच्या वातावरणात सपन्न झाली.या सभेमध्ये पालकांचा शाळेविषयी चांगला प्रतिसाद दिसून आला.या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.देविदास गोडसे पाटील,सहसचिव प्रा.संदीप देवगिरे,संचालिका मीरा गोडसे,प्राचार्या सोनाली जोशी, प्रा.सतीश खोमणे व इतर शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी तसेच बसचालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.राजेंद्र खराडे यांनी केले.






