
व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी इतर आवश्यक गोष्टी बरोबरच चांगली संस्थात्मक कौशल्य, सर्जनशीलता आणि सतत लक्ष केंद्रित करणे आवश्यक आसते. त्याचबरोबर स्पर्धेबाबत जागरूक असणे देखील महत्त्वाचे असते. कधीकधी वैयक्तिक त्याग करण्यासही तयार राहावे लागते. कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी किंवा त्यामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे लागते, आवश्यक वेळेत, आवश्यक ठिकाणी शीर्षस्थानी राहावे लागते. कोणत्याही व्यवसायामध्ये सर्जनशील आणि धोरणात्मक होणं फार गरजेचं असतं. आपल्या स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवून, ध्येयावर लक्ष केंद्रित करून व्यवसायाची उभारणी करणे फार गरजेचे असते. उत्तम ग्राहक सेवा देऊन आपला उद्योग व्यवसाय उंच शिखरावर नेऊ शकतो अशाच एका युवा उद्योग व्यावसायिकाचा वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेला लेखाजोखा नूतन प्राथमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी श्री पंकज इंद्रकुमार धोंगडे यांनी घेतलेल्या गगनभरारीची माहिती अशी की, प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण ही नूतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये घेऊन दिनांक ९ फेब्रुवारी २०२० रोजी मिरजगाव शहरांमध्ये धोंगडे सुपर मार्केट या व्यवसायाची सुरुवात करून अल्पावधीतच उत्तुंग यश मिळवले. युवा उद्योजक ते अरिहंत पतसंस्थेचे चेअरमन हा प्रवास करत असताना अनेक अडथळे समस्या पार करत ध्येयापर्यंत वाटचाल करण्यास सुरुवात केलेली असून बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेली अरिहंत पतसंस्था म्हणजे गरीब, होतकरू, छोट्या मोठ्या व्यवसायिकांना व्यवसाय वाढीसाठी अल्पशा व्याजदराने कर्ज देऊन सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःच्या भक्कम पायावर उभा राहण्यासाठी अरिहंत पतसंस्थेच्या वतीने आर्थिक साह्य केले जात आहे. संस्थेमार्फत फक्त नफा न कमवता विविध शालेय उपक्रम विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा भेट वस्तू वह्या, पेन वाटप देखील केले गेले आहे. चालू वर्ष २०२५ मध्ये सर्व ग्राहकांना दिनदर्शिकेचे मोफत वितरणही केले आहे. तसेच संस्थेच्या सर्व ठेवीदारांना दरवर्षी गृह उपयोगी भेट वस्तूही दिल्या आहेत. धोंगडे मार्केट व अरिहंत पतसंस्था मिळून १०० कर्मचाऱ्यांना रोजगार या निमित्ताने मिळवून दिला आहे. तरोच संस्थेची तब्बल ५००० ग्राहकांना पासबुक बॉक्स वाटप देखील केली गेली आहेत. बैंकिंग व्यवसाय तसेच शैक्षणिक कार्यात कायम अग्रेसर असलेलं एक युवा कर्तुत्ववान नेतृत्व म्हणून पंकज धोंगडे यांच्याकडे पाहिलं जातं. केवळ रक्ताचच नव्हे तर माणुसकीच ही नातं जपणार सर्वांना बरोबर घेऊन चालणार अस हे व्यक्तिमत्व. आजही वाढदिवसाच्या निमित्ताने बैंकिंग आणि व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने मिरजगाव परिसरातील शाळांमध्ये ३००० वह्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने वाटप केले आहे. नूतन प्राथमिक विद्यालय मिरजगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव, विश्वनाथ भाऊ आजबे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिराळ, भारत विद्यालय मिरजगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरवपिंपरी, जिल्हा प्राथमिक शाळा चांदे बुद्रुक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंभळी, न्यू इंग्लिश स्कूल चांदे, श्री दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक शाळा मुळेवाडी इत्यादी ठिकाणी अरिहंत पतसंस्थेचे चेअरमन पंकज कुमार धोंगडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करतेवेळी अरिहंत पतसंस्थेचे मॅनेजर विजय वतारे, सचिव अमोल सकट, संचालक प्रवीण पंडित, लतीफ तांबोळी, अरविंद झांबरे, आजिनाथ शिंदे व ज्या शाळेमध्ये शाली साहित्य वाटप केले त्या विद्यालयाची सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीचं नातं जपणार, अल्पावधीतच आपल्या व्यवसायाला यश शिखरावर पोहोचविणार कर्तुत्ववान युवा नेतृत्व म्हणजे पंकज धोंगडे.
वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्यासाठी व आपल्या उद्योग व्यवसायात आपलं नाव सातासमुद्रापलीकडे जावो हीच शुभेच्छा !!!!






