
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाची संशोधक विद्यार्थिनी संध्या भरत देशमुख यांची राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत निवड झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील मिळून विद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये एकूण २८८ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यात ‘मेडिकल व फार्मसी’ गटात संध्या भरत देशमुख यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्यांनी रेडियशन मोजता येणारे फोसफोर पदार्थ विकसित केले.
संध्या भरत देशमुख यांच्या निवडीबद्दल दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संध्या देशमुख ह्या सध्या दादा पाटील महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयामध्ये डॉ. महेश भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी चे संशोधन करीत आहेत. या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीसह प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी संध्या भरत देशमुख यांचे अभिनंदन केले.







