प्राध्यापिका प्रियंका विठ्ठल जाधव यांना पीएचडी प्रदान 

0
130
Google search engine

 

हिंगनगाव तालुका गेवराई येथील प्राध्यापिका प्रियंका विठ्ठल जाधव यांना भगवंत विश्वविद्यालय , अजमेर येथून नुकतीच औषधनिर्माणशास्त्र विषयातील सर्वाच्च पदवी पीएचडी प्रदान करण्यात आली . नॉवेल ॲप्रॉचेस हरबल मायक्रोस्पाँजेस डीझाईन फॉर्मुलेशन अँड कॅरॅक्टरायजेशन हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.तसेच त्यांचे अनेक संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित झाले असून अनेक परिसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे .त्यांना डॉ. राजसेकरण यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठान , औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे अध्यक्ष एन . डी.कासार, सचिव विक्रम कासार , अतुल जाधव , अमोल जाधव , डॉ.रामदास पांढरे , मुळा एज्युकेशन सोसायटी चे प्राध्यापक डॉ. अनिल पवार यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.