कर्जत येथे महा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

0
261
Google search engine

 

दादा पाटील महाविद्यालय कर्जत, जि. अहिल्यानगर आयोजित रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘DPMK महा मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना विभाग व एनसीसी विभागामार्फत करण्यात आले होते. अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात सदर स्पर्धा संपन्न झाली.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी महाविद्यालयातील ज्यूनियर व सीनियर विभागातील विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. जवळपास दोन हजाराहून अधिक मुला-मुलींनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ठाणे येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. संजय निंबाळकर, उद्योजक दीपकशेठ शिंदे, पत्रकार गणेश जेवरे , उद्योजक राहुल नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच मोठ्या प्रमाणावर कर्जत ग्रामस्थ व महाविद्यालयातील सर्व सेवक उपस्थित होते.

या स्पर्धेची सुरुवात वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. संजय निंबाळकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या बारा मुले व बारा मुली यांची निवड करण्यात आली.

 

मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकामध्ये मुलांमध्ये ओम अनिल खताळ याने तर मुलींमध्ये कु .आरती संदीप शेवाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावले. उर्वरित विजेत्यांमध्ये प्रकाश गोवर्धन टेकाळे, वैभव दिलीप कांबळे, सागर भाऊसाहेब गडदे, ओंकार बाळासाहेब चौगुले, गणेश भारत बांदल, आदित्य बाळू उकिरडे, विशाल शांताराम पिटेकर, आदित्य युवराज गलांडे, आनंद बाळू अर्णे, तुषार जालिंदर खोमणे, ओंकार रितेश पठाडे तसेच मुलींमध्ये अक्षदा शिवाजी श्रीराम, भाग्यश्री प्रकाश धनवडे, वैष्णवी प्रवीण आजबे, अनुष्का संजय देवकर, नम्रता दादासाहेब काळदाते, वैष्णवी अजिनाथ अनारसे, कोमल धनाजी बिटके, पूजा प्रशांत बळे, स्नेहल श्रीराम एकाड, दिपाली आप्पासाहेब बागल, प्रतीक्षा ईश्वर पावणे या मुला मुलींनी यश संपादन केले.

बक्षीस वितरणाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मॅरेथॉन स्पर्धा संपल्यानंतर लगेचच घेण्यात आला. बक्षीस वितरणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. संजय निंबाळकर तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे येथील उद्योजक राजेंद्र तनपुरे तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विभागांचे उपप्राचार्य, ज्युनिअर कॉलेजचे सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मॅरेथॉनमध्ये सहभागी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनसीसी छात्र व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली.

या मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिमखाना विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष भुजबळ, एनसीसी विभाग प्रमुख मेजर डॉ .संजय चौधरी, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. पवन कडू, प्रा.दिव्या शिलवंत, तसेच DPMK महा मॅरेथॉन स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्व कमिटी चेअरमन त्यांचे सदस्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के व प्रा. राम काळे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा.राजेश दळवी यांनी आभार मानले