
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथील खेळाडूंनी कुस्तीमध्ये अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत स्पर्धे निवडीतून अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे या स्पर्धेमध्ये कुमार नयन गोरख पाखरे यांनी ६१ किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक मिळवलेले आहे. तसेच सागर बाळासाहेब कांबळे यांनी ९२ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक मिळवलेले आहे व आदित्य प्रवीण ढेरे यांनी ९७ किलो वजन गटांमध्ये रोपे पदक मिळवले आहे. या खेळाडूंची अखिल भारतीय विद्यापीठ कुस्तीमध्ये निवड झालेले आहे या कुस्ती स्पर्धा गुरु काशी विद्यापीठ भटिंडा पंजाब या ठिकाणी होणार आहेत या कुस्ती खेळाडूंचं मिरजगाव पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे या खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून साठी सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. बी.के पारखे सर तसेच प्रा.पी.सी सावंत सर लाभले या सर्व खेळाडूंचे अभिनंदन संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरशेठ नेवसे , संस्थेच्या अध्यक्षा सौ. कल्याणीताई नेवसे ,संस्थेचे सचिव राजेंद्र गोरे, सद्गुरु कृषी महाविद्यालयाची प्राचार्य माननीय डॉ. रामदास बिटे प्रशासकीय अधिकारी मा. सखाराम राजळे सर, संस्थेचे समन्वयक तथा शिवशंकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरज जाधव सर, तसेच शिक्षक शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या व गुरु काशी विद्यापीठ भटिंडा पंजाब येथे दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी रोजी संपन्न होणार आहेत. त्यांच्या पुढील अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .






