संविधान अवमान व भीम सैनिक सोमनाथ सुर्यवंशी हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने उद्या कर्जत बंदची हाक

0
258
Google search engine

 

 

परभणी घटनेच्या निषेधार्थ  उद्या मंगळवारी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने कर्जत शहर बंदची हाक देण्यात आली असून  परभणी येथे संविधानाचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी त्याच बरोबर न्यायालयीन कोठडीत असलेल्या भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतीची १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने तोडफोड केली आहे.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विचार धारेच्या पुरोगामी चळवळीच्या महाराष्ट्रात असा प्रकार होणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे. कारण संपूर्ण जगामध्ये संविधानाचा ‘गौरव होत असताना परभणी येथील असे कृत्य होत असेल तर ते कृत्य करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला फाशी देण्यात यावी.त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे परभणी न्यायालयीन कोठडीत भिमसैनिकाच्या झालेल्या हत्येची CBI अथवा CID मार्फत चौकशी हौऊन दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी.त्याच बरोबर निरपराध भिमसैनिकावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी रिपाईच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी कर्जत शहर बंदची हाक  देवून आंदोलन करण्यात येणार आहे .सदरची निवेदनाची प्रत अध्यक्ष सचिव, व्यापारी संघटना कर्जत , सर्व पत्रकार  कर्जत यांना देण्यात आली आहे.यावेळी दतात्रय कदम , जिल्हा उपाध्यक्ष रिपाई , विशाल काकडे आरपीआय युवक जिल्हा उपाध्यक्ष, धीरज पवार ,अक्षय भैलुमे, भरत गुंड,शुभम माने,वसीम शेख,सुरज इचके,प्रशांत होले,सिद्धांत कदम,संघराज भैलुमे,सुनील खरात,अजय चौधरी,अवि आढाव,अभिजीत भैलुमे,अमजद शेख,बापू डुकरे आदी उपस्थित होते.