परभणीतील घटनेचा राशीन येथे निषेध

0
510
Google search engine

 

परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेचा शुक्रवारी (दि.१३) सकाळी राशीन (ता. कर्जत) येथे निषेध करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांनी संविधान वाचन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. अतुल साळवे यांनी संविधानाचे उद्दिषकेचे वाचन केले .

यावेळी आरपीआयचे भीमराव साळवे, रवींद्र दामोदरे, अतुल साळवे, विशाल गंगावणे , जितेंद्र गजरमल , ॲड.अक्षय तुकाराम साळवे , गणेश गोविंद साळवे , सागर गायकवाड ,सय्यद अय्याज , राहुल साळवे , दयानंद आढाव , सचिन साळवे मनसे अध्यक्ष ,मातंग एकता अध्यक्ष संतोष डावरे , सलीम भाई जहागीरदार ,नवनाथ साळवे यांच्यासह परिसरातील व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परभणी येथील समाज कंटकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली.