
अजित शेळके यांची मराठा मावळा संघटना कर्जत तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे पाटील यांच्या सहीने त्यांना हे निवडपत्र देण्यात आले.यावेळी दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे की , आपल्याला असलेल्या मराठा बहुजन समजाच्या प्रश्नांचे ज्ञान तसेच आपण केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून आपली मराठा मावळा या सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्ष कर्जत पदी नियुक्ती करण्यात येत आहे.आपणास दिलेली संघटनेची जबाबदारी निष्ठेने पूर्ण कराल अशी सदिच्छा. निवडीबद्दल अजित शेळके यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.






