
किट्टी आडगाव ता. माजलगाव येथील प्रा. विशाल रमेश रासवे यांना ओरिएंटल विद्यापीठ, इंदौर , मध्यप्रदेश येथून फार्मास्युटिकल सायन्स क्षेत्रामध्ये पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली . डॉ. विशाल रासवे सध्या श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च, कडा, आष्टी, बीड येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. विशाल रासवे यांनी “एक्सट्रॅक्शन, आयसोलेशन आणि कॅरेक्टरायझेशन ऑफ बायोएक्टिव कंपाउंड्स फ्रॉम क्लेमाटिस ट्रायलोबा अँड फार्म्युलेशन डेव्हलपमेंट ऑफ समेड्स अँड देअर इव्हॅल्युएशन्स फॉर अँटीडायबेटिक एक्टिविटी” या विषयावर आपला संशोधन प्रबंध पूर्ण केला. त्यांच्या संशोधनाला डॉ. अनूपकुमार चक्रवर्ती सर यांचे मार्गदर्शन लाभले. ओरिएंटल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सोमानी सर यांच्या हस्ते त्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. विशाल रासवे यांनी पीएच.डी. करत असताना 57 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले, 3 पेटंट्स प्राप्त केले आणि फार्मसी क्षेत्रातील 3 पुस्तके प्रकाशित केली आहेत. ते अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, मराठवाडा कार्यकारी सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
या यशासाठी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेशजी भंडारी, सचिव श्री. हेमंतजी पोखरणा, आणि संस्थेच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच डॉ. नीलेश जाधव सर, डॉ. मृणाल शिरसाट सर. डॉ. ज्ञानदेव गाढवे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. किट्टी आडगाव येथील फार्मसी क्षेत्रातील पीएच.डी. पदवी प्राप्त करणारे डॉ. विशाल रासवे हे सर्वांत तरुण असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना डॉ. विशाल रासवे म्हणाले, “पीएच.डी. पदवी मिळवणे हे माझे ध्येय होते. या प्रवासात मला माझ्या आई-वडील, बहीण, भाऊ, मित्रपरिवार, आणि प्राध्यापकांचे अमूल्य सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.”
डॉ. विशाल रासवे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.







