

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ , कर्जत -जामखेड २२७ विधानसभा मतदार संघातील निवडणूक पार पडल्यानंतर कर्जत तालुक्यातील दूरगाव गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ एकत्रित येऊन चहा पाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. निवडणूक म्हटलं की वाद विवाद ह्या गोष्टीला सामोरे जावं लागतं परंतु दुरगाव हे असे एक गाव आहे. या गावामध्ये आज पर्यंत कसलाही वाद विवाद न होता निवडणूक पार पडते .त्याचप्रमाणे दिनांक २०.११.२०२४ रोजी झालेली विधानसभा निवडणूक पार पडताच गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते गावातील बाहेरगावी नोकरीसाठी गेलेले मान्यवर तसेच ग्रामस्थ एकत्रित येत पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण गावात निर्माण होण्यासाठी अठरा पगड समाज बांधवांना एकत्रित घेत कार्यक्रम पार पडला. प्रत्येक निवडणूक पार पडली की दुसऱ्या दिवशी चहा पाण्याचा कार्यक्रम पार पडत असतो. त्यासाठी सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन चहा पाण्याचा आनंद घेतात . यावेळी दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले, यामध्ये माणिक भाऊ जायभाय सुभाष दादा भगत उप सरपंच पप्पू शेख फिरोजभाई मोगल आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य चेअरमन, व्हा.चेअरमन संचालक मंडळ सर्वजण उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार दुरगाव चे सुपुत्र ॲडव्होकेट संतोष जायभाय यांनी केले.






