
भूमिपुत्र आमदार प्रा. राम शिंदे साहेब यांचे निकाला अगोदरच फ्लेक्स झळकला असून कट्टर समर्थक युवा नेते साहिल दादा काझी यांचा राशीन येथे फ्लेक्स झळकला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँटे की टक्कर पहावयास मिळाली. जिल्ह्यात सरासरी ७१ टक्के मतदान झाले आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असली तर निकालापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये आ .राम शिंदे यांचे विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत.
२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघात मोठ्या चुरशीने मतदान झाले असून सरासरी ७१ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा टक्का वाढल्याने नेमका धक्का कोणाला बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच आता चौकाचौकात कोण विजयी होणार कोण पराभूत होणार याच्या खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत. मतदान केंद्रनिहाय कोणाला किती मतदान होईल याची आकडेमोड जोरात सुरु आहे. अनेकांच्या पैजाही पडल्या आहेत.
आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे गृहीत धरुन कर्जत जामखेड मतदार संघात आ. राम शिंदे यांच्या विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत. निकालापूर्वीच फ्लेक्स झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत






