कर्जत-जामखेड ही संतांच्या आणि महापुरुषांच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी : डॉ.नितीन पिसाळ 

0
315
Google search engine

 

कर्जत जामखेड मतदार संघाच्या सुवर्णमयी भविष्यासाठी, माता भगिनींच्या सुरक्षेसाठी, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी, माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासाठी, कर्जत जामखेड मतदार संघाचा गेल्या १०-१५ वर्षातील राहिलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी, आपला कर्जत जामखेड मतदार संघ सुरक्षित हातात देण्यासाठी आदरणीय रोहित दादा पवार साहेब यांना आपले बहुमोल मत देऊन त्यांचे हात बळकट करूया असे आवाहन डॉ. नितीन पिसाळ यांनी केले आहे.

जामखेडमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या सभेत घडलेल्या घटनेवर माझे मत व्यक्त करू इच्छितो. सभेत जे झालं ते आपल्या सर्वांना माहित आहे. भाजप कार्यकर्त्यांनी भाषणात शिव्या आणि खालच्या पातळीची भाषा वापरण्याची हद्द पार केली. आणि त्याहून जास्त गंभीर म्हणजे पाशा पटेल यांनी राम शिंदे यांच्या सभेत माता भगिनींसमोर गलिच्छ चाळे आणि घाणारडे हातवारे करून निर्लज्जपणाचा कळस गाठला. राम शिंदे हे फक्त भाजपचे नेते नाही तर प्राध्यापक सुद्धा आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही कार्यकर्ते शिक्षक आहेत. असे गलिच्छ भाषा वापरणारे आणि शिव्या देणारे शिक्षक असतील तर महाराष्ट्राचं काय होईल…? कर्जत-जामखेड ही संतांच्या आणि महापुरुषांच्या आशीर्वादाने पावन झालेली भूमी आहे. अशा पवित्र भूमीत असे गुंडगिरी आणि गुंडशाही बजावणारे आम्हाला नको आहेत. आज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व युवकांना नोकरी पाहिजे, अशावेळी नोकरी देणारा, उद्योग आणणारा आमदार रोहीत दादांसारखा खंबीर आमदार आम्हाला पाहिजे. महिलांविषयी गलिच्छ भाषा वापरत असेल तर अशा व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार. म्हणून, गुंडगिरीमध्ये नाही विकासकामांमध्ये भर पडेल अशा नेत्याला आपल्याला निवडून द्यायचे आहे. ते नेतृत्व आमदार रोहीत दादा आहेत . कर्जत-जामखेडमधील माताभगिनी भयभयीत नाही तर सुरक्षित वाटलं पाहिजे. अशा गुंडशाहीला राम राम करून कर्जत-जामखेडच्या चांगल्या भवितव्याचा विचार करा.