
टाकळी खंडेश्वर सरपंच पदी आज श्रीमती मंगल गोरक्षनाथ भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सभेला उपसरपंच फैमिदा युसुफ सय्यद , , काकासाहेब विश्वनाथ सकट , सागरकुमार गिरजाबापु ढोबे, सौ. जाईबाई परशुराम तांबे, सौ.मंगल काशिनाथ पवार, श्री अमोल शिवाजी पाटील, सौ रोहिणी अबासाहेब फरताडे,
श्रीमती मंगल भालेराव आदी उपस्थित होत्या .श्री. ज्ञानेश्वर दत्तात्रय डुबल सदस्य गैरहजर राहिले.निवडणूक अभ्यासी अधिकारी म्हणून बी.के.शेळके यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी अमित मच्छिद्र कोल्हे व तलाठी थोरात मॅडम उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती.मंगल गोरक्षनाथ भालेराव म्हणल्या , येणाऱ्या काळात गावाचा सर्वसमावेशक विकास करणार असून सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने मूलभूत गरजा व इतर सर्व सुविधा आदी बाबींवर काम करणार आहे.
निवडीबद्दल मंगल गोरक्षनाथ भालेराव यांचे किरण पाटील माजी उपसभापती पंचायत समिती कर्जत, बापुसाहेब काळदाते सरपंच चिंचोली काळदात, संतोष बापु भोसले मा. सरपंच पाटेवाडी व ग्रामस्थांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.






