
आमदार प्रा .राम शिंदे साहेब हेच शास्वत विकास करू शकतात अशी पक्की खात्री सर्वसामान्य जनता तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांची आहे.म्हणूनच आपल्या हक्काच्या भूमिपुत्राला सर्वसामान्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत असून आ. प्रा.राम शिंदे साहेब यांचा विजय निश्चित असल्याची खात्री विकास गायकवाड यांनी दिली.आ.रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात कोणत्याही गावात विकासाचे एकही काम केले नाही .विकासाच्या नुसत्या थापा मारल्या , काम न करता नुसती जाहिरातबाजी केली.आपल्या मातीतला आपला भूमिपुत्रच आपले प्रश्न सोडवू शकतो.अवर्षणग्रस्त भाग असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ पाणीदार करण्याचा विडाच आ.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना प्रामाणिक प्रयत्न केला .यासाठी त्यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी आणला.जलसंधारणाच्या कामांमध्ये ओढा , नदी खोलीकरण , रुंदीकरण , डीपी कट, तलावातील गाळ काढणे , तलावांचे एकत्रीकरण , डीप सीसीटी आदी कामे केली. आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असून त्यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.






