
कामाच्या जोरावर आणि लोकांचा प्रत्यक्ष संपर्क या जोरावर आमदार रोहितदादा पवार हे एक लाख मताधिक्य घेऊन निवडून येतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते संकेत कोरडे यांनी दिली. मतदार संघात आतापर्यंत हजारो कोटींची कामे आमदार रोहितदादा पवार यांनी केलेली आहेत.लोकांत जाऊन काम करणारा आमदार म्हणून रोहितदादा यांची ओळख आहे तेच खरे भूमिपुत्र आहेत. पाणी,आरोग्य,शिक्षण, बेरोजगारी,उद्योग या क्षेत्रात चांगले काम केले आहे.आमदार रोहितदादा पवार यांच्या विकासात्मत दूरदृष्टी त्यांना भावत असून आ.रोहित दादा पवार यांच्या जनसंपर्कामुळे ते मोठ्या मतांनी विजय संपादन करतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली .
सुख दुख घटना प्रसंगी प्रत्येकाच्या घरी आ .रोहित दादा पवार आणि त्यांचे कुटुंब उभा राहते. ज्या कुटुंबातल्या व्यक्ती कोरोना काळात दुःखद घटनेत गेल्या त्या कुटुंबाला दीपावली फराळ सुद्धा आ .रोहित दादांनी घरपोहच दिला असे एकमेव आमदार हे रोहित दादा पवार आहेत. कुठलाही जाती,धर्म , पंथ भेदभाव न करता कुटुंबा प्रमाणे कर्जत जामखेड मतदारसंघ त्यांनी जपला आहे .







