
राजूर तालुका अकोले येथील प्रा. डॉ. माधुरी दत्तात्रय देशमुख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, अंतर्गत मेट इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, नाशिक महाविद्यालय येथून नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी फॉर्मुलेशन अँड इव्हूलुऐशन ऑफ अँटीएजिंग हर्बल क्रीम बाय युजिग कॅलरिफाइड बटर,या शोध कार्यावर प्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ. मोरेश्वर पाटील आणि प्राचार्य डॉ.संजय क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबरोबरच त्यांना सेन्टेरल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया,शिष्यवृत्ती विभागची फेल्लोशीप मिळाली होती. त्यांनी ६ इंटरनॅशनल जर्नल्स शोधनिबंध व १ पेटंट, प्रकाशित केले आहे . राजूर , या गावातील पीएचडी पदवी अगदी कमी वयात प्राप्त केलेले त्या प्रथम असून त्यांचे वडील मा.सभापती म्हणून अकोले पंचायत समिती मध्ये कार्यरत होते.






