
बाभळेश्वर येथील प्रा. राहुल ज्ञानेश्वर खैरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने औषध निर्माण शास्त्र विषयातील सर्वोच्च पदवी पीएच. डी प्रदान केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत , जिद्दीने त्यांनी हे यश मिळवले. डेव्हलपमेंट ऑफ स्टाबिलिटी इंडिकेटिंग अनालिटिकल मथोड्स फॉर सम ड्रग्स इन बल्क अँड फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. तसेच त्यांचे २ संशोधनपर शोधनिबंध स्कोपस इंडेक्स तसेच यु.जी.सी सारख्या राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले असून अनेक परिसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग देखील नोंदवला आहे. या कामी त्यांना डॉ. विखे पाटील फोंडेशन कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रताप पवार सर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. राहुल ज्ञानेश्वर खैरे हे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ फार्मसी (महिला), सिन्नर येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्या डॉ. चारुशीला भंगाळे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील संस्थेच्या सीईओ डॉ.सुष्मिता विखे पाटील आणि अतिरिक्त सीईओ डॉक्टर शिवानंद हिरेमठ यांनी अभिनंदन केले.







