महात्मा गांधी विद्यालय मध्ये बाल आनंद मेळावा 

0
241
Google search engine

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत नुकताच महात्मा गांधी विद्यालय मध्ये बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. त्यामध्ये जवळपास २४६ मुलांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष बाजार भरल्यानंतर कशा पद्धतीने मालाची खरेदी विक्री कशी होते याचा अनुभव घेतला. नफा तोटा कसा होतो हे प्रत्यक्ष अनुभवले .या कार्यक्रमाचे उद्घाटन दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर सर व विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड मॅडम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य राजकुमार चौरे, बाल आनंद मेळावा विभाग प्रमुख जयश्री कोल्हापुरे , शिल्पा शेलार ,उपमुख्याध्यापक लालासाहेब शिंदे व पर्यवेक्षक राजेंद्र गीते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या उपक्रमाचे सर्व पालक, विद्यार्थी, स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र तात्या फाळके, अंबादास पिसाळ, बापूराव धांडे तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल सदस्य आ.रोहित पवार यांच्याकडून अभिनंदन होत आहे .