
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी आयोजित ‘अविष्कार संशोधन स्पर्धा’ अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, सायन्स व कॉमर्स महाविद्यालयात ३ कॅटेगरीसाठी तर श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम कला आणि संजीवनी वाणिज्य महाविद्यालय, कोपरगाव येथे ३ कॅटेगरीसाठी विभागीय पातळीवर आयोजित करण्यात आल्या होत्या
सदर स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालयातील वेगवेगळ्या संशोधन प्रकारामध्ये एकूण सहा संशोधन प्रकल्पाची विद्यापीठ स्तरावर निवड करण्यात आली.
विभागीय पातळीवर वेगवेगळ्या महाविद्यालयातील जवळपास ४५० संशोधन प्रकल्पामधून दादा पाटील महाविद्यालयातील एकूण सहा संशोधन प्रकल्पांची निवड होणे ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. भोंडवे योगिता व फरताडे तेजस्वी (प्रथम वर्ष विज्ञान) यांनी कोळपणी यंत्राचे फायदे यावर संशोधन सादर केले. कु. सरवदे प्रज्ञा व बरबडे अश्विनी (प्रथम वर्ष विज्ञान) यांनी ई -कॉमर्स मध्ये नवीन अँप विकसित केले. कु. घाडगे सानिका (द्वितीय वर्ष विज्ञान) यांनी कॅन्सर रुग्णांवरील रेडिएशन मोजता येणारे उपकरणावर संशोधन सादर केले. कु.पवळ प्रतीक्षा व काकडे प्रिती (द्वितीय वर्ष विज्ञान) यांनी वॉटर सॉक्सलेटवर संशोधन सादर केले. कु.गावडे सुप्रिया (पीएच.डी द्वितीय वर्ष बॉटनी) यांनी चमकणाऱ्या वनस्पतीवर संशोधन सादर केले तर कु.देशमुख संध्या (पीएच.डी तृतीय वर्ष फिज़िक्स) यांनी रेडिएशनवर संशोधन सादर केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील संशोधन समितीचे समन्वयक डॉ. महेश भदाणे तसेच प्रा. बलभीम महारनवर, डॉ. संगीता कुलकर्णी यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.
महाविद्यालय विकास समिती यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी या दैदीप्यमान यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.







