कर्जत राशीन रस्त्यावर कोळवडी येथे येत्या १५ दिवसात दिशादर्शक फलक व गतिरोधक बसवणार , भारतीय जनता पार्टीचे ओबिसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुनील क्षीरसागर यांच्या व ग्रामस्थांच्या मागणीला यश

Google search engine

 

कर्जत-राशीन रस्ता मौजे कोळवडी येथे गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवणेबाबत सुनिल  क्षीरसागर, तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा व राहुल नवले , सुनील क्षीरसागर , पांडुरंग दवणे , पोलीस पाटील गोरख जमदाडे , पोपट नलवडे , धनराज कवडे , औंदुबर भोसले , अशोक काका खेडकर , युवराज खानवटे , विनोद दवणे , मनोज कवडे , शिवाजी कवडे , शरद कवडे , विनोद थोरात , सोमा डमरे , दादा उकीरडे , केतन साबळे व समस्त ग्रामस्थ कोळवडी यांनी दि.०२ डिसेंबर २०२४ यांनी अर्ज दिला होता .हा अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागात दाखल झाल्यानंतर या अर्जाची तत्काळ दखल घेत अमरापुर-पाथर्डी रस्ता राज्य मार्ग -५४, मौजे कोळवडी येथे गतिरोधक व दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी आहे. तरी आपल्या अर्जाबाबत कार्येवाही करून येत्या १५ दिवसात गतिरोधक व दिशा दर्शक फलक बसविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली तसेच दिनांक ०७ डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या रस्ता रोकोपासून परावृत्त व्हावे अशी विनंती त्यांना पी. पी. वाकचौरे ,सहाय्यक अभियंता श्रेणी -१ सार्वजनिक बांधकाम उप विभाग कर्जत यांनी केली आहे

या अर्जाची प्रत मा. निवासी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव व मा. उपविभागीय अधिकारी उपविभाग कर्जत यांना माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव सादर व तसेच प्रत. मा. तहसिलदार तहसिल कार्यालय कर्जत  व पुढील कार्यवाही  पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस स्टेशन कर्जत यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहे.