
आ.रोहित दादा पवार यांनी तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली तरी मात्र त्यांचा थोड्याच मतांनी विजय झाला अशी खंत व्यक्त करत थेरगावचे मा.चेअरमन संभाजी बेद्रे यांनी “प्रतिक्रिया देत आ.रोहित दादांनी विकासकामे केली मात्र आम्हाला विकास नकोय , असा मतदार मतदार संघात असून आमच्या अडचणी सोडवणारा हक्काचा माणूस नकोय , हाकेला ओ देणारा आमदार नकोय , न मागता खूप काही देणारा दूरदृष्टी लोकप्रतिनिधी नकोय , दारात येऊन उपचार करणारा आरोग्यसेवक नकोय , माता-भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवणारा भगिरथ नकोय , दुष्काळात मोफत टँकर देणारा पाणीवाला नकोय , कोविडमध्ये घरात न बसता प्रत्येकाची कुटुंबासारखी काळजी घेणारा नकोय आणि लंपीसारख्या रोगापासून मुक्या जीवांना वाचवणारा रक्षकही नकोय ,
कारण आम्हाला पाहिजे जातीचा , मग भले त्याने पाच पाच वर्षे तोंड दाखवलं नाही तरी चालेल.
न मागताच आम्हाला रस्ते, वीज, पाणी द्यायला तुम्हाला कुणी सांगितलं ?न बोलावताही दारोदारी जाऊन लोकांना औषध गोळ्या द्यायला तुम्हाला कुणी सांगितल्या?
हजारो टँकर मोफत पाणी द्यायला तुम्हाला कुणी आग्रह केलता ? कोट्यावधी रुपये निधी आणून टोलेजंग हॉस्पिटल बांधायची मागणी तुमच्याकडं कुणी केली होती?
एमआयडीसीसाठी आश्वासनावर झुलवत ठेवण्याऐवजी तुम्ही संघर्ष का करत राहिलात ?
चिखलांचे, दगडांचे, खड्ड्यांचे रस्ते असताना तुम्ही चांगले रस्ते का केले ? रस्त्याने जाताना कंबर मोडल्यानंतर आपोआपच तुमच्याकडे मदतीसाठी आलो असतो ना आम्ही!
संत गितेबाबा गडाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये का आणले? जगातला सर्वांत उंच स्वराज्य ध्वज का उभा करून खर्ड्याचा नावलौकिक केला लोकांना विकास नकोय हक्काचा मानुस नकोय . दादा आपण येत्या २५ वर्षांसाठी आम्हाला आमदार हवे आहेत आणि दादा आमदार राहतील अशा विश्वास मला आहे
मा. संभाजी बेद्रे , चेअरमन
बेद्रे उद्योग समुह थेरगाव







