विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी आ.राम साहेबांचा विजय निश्चित: डॉ.सतीश काळे , ग्रामपंचायत सदस्य , माही 

Google search engine

 

आ.रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात माही , जळगाव मध्ये विकासाची कामे केली नाहीत . आ.पवार यांनी विकासाच्या नुसत्या थापा मारल्या , काम न करता नुसती जाहिरातबाजी केली.आपल्या मातीतला आपला भूमिपुत्रच आपले प्रश्न सोडवू शकतो आमदार प्रा .शिंदे साहेब हेच शास्वत विकास करू शकतात अशी पक्की खात्री सर्वसामान्य जनता तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांची आहे.म्हणूनच आपल्या हक्काच्या भूमिपुत्राला सर्वसामान्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे.रोहित पवार यांनी कोणतेही मोठे काम मतदार संघात लोकोपयोगी असे मोठे काम केले नाही. त्यांनी तरुण पिढीला फक्त बरबाद होईल असे वक्तव्य करून त्यांची डोके भडकावू वक्तव्य करीत आहेत तरी तरुणांनी यापासून सावध भूमिका घ्यावी.युवकांची माथी भडकावून त्यांना वाईट मार्गाला लावणे हे काम काही जण करतात त्यामुळे येणाऱ्या पिढीने योग्य माणूस निवडावा. गेल्या वेळी जे युवक त्यांच्या बरोबर गेले होते त्यांची आज काय भावना आहे हे सुध्दा पडताळणी करून पहावे , असेही त्यांनी यावेळी आवाहन केले .