
पद्मावती टाईल्स अँड पेंट्स हे मांदळी येथील फर्म अल्पावधीतच ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे.टाइल्स आणि पेंट्स व्यवसायात उगले परीवारांनी टाकलेले पाऊल नक्कीच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ.दिलीप भोस यांनी केले. अहील्यानगर सोलापूर हायवे लगतच असलेल्या पद्मावती टाईल्स आणि पेंट्स या फर्मच्या वतीने दिपावली व पाडव्याच्या निमित्ताने पेंट्स व बांधकाम कामगारांना तसेच कॉन्ट्रॅक्टर यांना दिवाळीची भेट म्हणून गिफ्ट व दिवाळीचा स्वीट वाटपाचा कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी ते बोलत होते. दिपावली पाडव्याच्या निमित्ताने व फर्मच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त संचालक प्रसाद बाळासाहेब उगले परिवाराच्या वतीने तब्बल २५० जणांना दिवाळी गिफ्ट व मिठाई उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली .या कार्यक्रम प्रसंगी पै.अर्जुन देवा शेळके , श्रीरंग आप्पा उगले , किसन दादा उगले , उद्योजक डॉ .बाळासाहेब उगले , मिनिनाथ शिंदे , हौसराव गांगर्डे , आनंदराव गांगर्डे , आनंदराव गांगर्डे , संदीप
गांगर्डे , भागचंद पांडुळे , फर्मचे संचालक प्रसाद शेठ बाळासाहेब उगले पेंट्स , बांधकाम कामगार , कॉन्ट्रॅक्टर , ग्राहक , हितचिंतक उपस्थित होते.
यावेळी बोलताना पद्मावती फर्मचे संचालक उगले म्हणाले ,मांदळी गावामध्ये असलेल्या पद्मावती टाईल्स अँड पेंटस या फर्मच्या वतीने दरवर्षी प्रमाणे गिफ्ट व मिठाईचे वाटप करण्यात आल्याने यामुळे पेंट्स , बांधकाम कामगारांची दिवाळी नक्कीच गोड होणार असल्याचे सांगितले .
टाईल्स, पेंट्स,साहित्य एकाच छताखाली उपलब्ध
कर्जत तालुक्यासह परिसरातील ग्राहकांना या फर्ममध्ये नॅरोलेक पेंट्स , एशीयन पेंट्स तसेच सर्व प्रकारचे मार्बल्स , ग्रेनाईट्स , पेंट्स व जे.के.अंबुजा सिमेंट सह सर्व नामांकित कंपन्यांचे सिमेंट एकाच छताखाली उपलब्ध आहे.







