श्री जगदंबा युथ सोशल फाउंडेशन , राशीनने केली वंचित मुलांबरोबर दिवाळी साजरी

Google search engine

 

राशीन येथील संस्कार विद्यार्थी निवासी वस्तीगृह बाल आश्रम या संस्थेतील मुलांसाठी जगदंबा सोशल फाउंडेशन यांच्यावतीने दिवाळी निमित्त मुलांच्या आवडीचे नवीन कपडे भेट देण्यात आले… जे मुलं अनाथ ,निराधार, अपंग असतात त्यांचे या जगात कोणी नातेवाईक नाही त्यांनाही या दिवाळीचा आनंद आपण देऊन या समाजाचे काही तरी ऋण फेडण्यासाठी या फाउंडेशनच्या सदस्यांनी वंचित मुलांच्या सहवासात दिवाळी साजरी केली.

याप्रसंगी ओंकर लोंढे ,राजवर्धन देशमुख,शौर्य देशमुख,विराज मरळ ,सोहेल काझी, निखील ढणके ,जुबेर काझी,बापू तकमोगे,चांद शेख ,गणेश गव्हाने ,जयदेव टकले हे उपस्थित होते.या स्तुत्य उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र आढाव यांनी आभार मानले.