माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या विजयासाठी निंबेतील युवकांचे करमाळ्याचे जागृत देवस्थान आई कमलादेवी चरणी साकडे

Google search engine

 

 

 

 

माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या विजयासाठी निंबेतील युवकांनी जागृत देवस्थान आई कमलादेवी चरणी साकडे घातले आहे.

कमलाभवानी माता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते.

यावेळी बुथ प्रमुख  माणिक खामगळ  , वैभव कोपनर, राजेंद्र खामगळ, अमोल कोपनर, युवराज काळे , माउली खामगळ आदी तरुणांनी आई कमलादेवी चरणी नतमस्तक होत

माजी मंत्री प्रा.आ.राम शिंदे यांच्या विजयासाठी साकडे घातले .

यावेळी बोलताना बुथप्रमुख माणिक खामगळ म्हणाले , कार्यतत्पर आमदार , भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होण्यासाठी आम्ही सर्व निंबेतील युवकांनी असून त्यांचे हात बळकट करमाळ्याचे ग्रामदैवत जागृत देवस्थान आई कमलादेवी चरणी साकडे घातले असून आ.राम शिंदे साहेबांचा विजय निश्चित असून त्यासाठी गावातील युवक कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.

आ.शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना खामगळ मळा येथे पाच बंधारे बांधून दिल्यामुळे आज तेथील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला आहे. गावचे ग्रामदैवत श्री.लिंबाजी महाराज मंदिर क वर्गात वर्ग केल्याने आज मंदिर परिसरात वेगवेगळी विकासकामे झाली. आ.प्रा.राम शिंदे साहेब मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे मधील विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही बुथप्रमुख माणिक खामगळ यांनी दिली.

आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी

गावाअंतर्गत सिमेंट रोड , ओढा खोलीकरण , बंधारे , सभामंडप , आदी विकासकामे केली आहेत.

या अशा भूमिपुत्रांच्या विजयासाठी जागृत देवस्थान आई कमलादेवी चरणी साकडे घातले असुन आ.प्रा.राम शिंदे साहेब नक्कीच मोठ्या मतांनी विजयी होतील अशी ग्वाही यावेळी बुथप्रमुख माणिक खामगळ यांनी दिली आमदार प्रा.शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुजाण मतदारांनी आ.प्रा.राम शिंदे साहेबांना मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन बुथप्रमुख माणिक खामगळ यांनी आवाहन केले .