जनभावना लक्षात घेवून अंबादास पिसाळ यांनी विधानसभा निवडणूक लढवावी : युवा उद्योजक तुषार कापरे पाटील 

Google search engine

 

सर्वसामान्य व्यक्तींच्या आग्रहामुळे अंबादास पिसाळ यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी युवा उद्योजक तुषार कापरे पाटील यांनी केली आहे. कर्जत जामखेड मतदार संघात कर्जत तालुक्यातील स्थानिक आमदार नसल्यामुळे विकासाला खीळ बसली असून स्थानिक कर्जत तालुक्यातील उमेदवाराला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कर्जत तालुक्यात तिसरा पर्याय म्हणून जनसामान्याचे नेतृत्व , सर्वसाधारण व्यक्तिमत्व , २४ तास समाजामध्ये मिसळून राहणारा नेता शांत , संयमी अशी ओळख असलेले जिल्हा बँकेचे कर्तुत्ववान संचालक अंबादास पिसाळ हे तिसरा पर्याय म्हणून उपलब्ध राहणार असून त्यांनी उमेदवारी करावी अशी मागणी युवा उद्योजक तुषार कापरे पाटील यांनी केली आहे . कर्जत तालुक्यात विकास करण्यासाठी येथील स्थानिक उमेदवार पाहिजे असून यासाठी अंबादास पिसाळ हे सक्षम उमेदवार आहेत. शांत ,संयमी स्वभावाचे असून जनसामान्यांच्या प्रश्नांवर संवेदनशिलतेने काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली आहेत. ते नेहमीच तालुक्यातील शेतकरी , युवक आदींच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असतात, बप्पाजींच्या दीर्घ राजकीय अनुभवामुळे आणि समर्पित सेवेमुळे मतदार संघाच्या प्रगतीसाठी ते मोलाची भूमिका बजावतील. सर्वसामान्य जनतेतून त्यांच्या उमेदवारीसाठी जोर धरत असून सर्वसामान्य तालुक्यातील जनता प्रचंड आग्रही आहे . त्यांना कर्जत ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती , जिल्हा परिषद , सहकारी बँक आदींचा दांडगा अनुभव असल्यामुळे बप्पाजींचे तळागाळातील कार्यकर्त्यांची नाळ जोडलेले आहे तसेच या गोष्टीचा कधीही ते बडेजावपणा करत नाहीत. मोठ्या धनशक्ती विरोधात ते तालुक्यातून उभे ठाकले असून ते उमेदवार असल्यास विजय निश्चित असल्याची ग्वाही युवा उद्योजक तुषार कापरे पाटील यांनी दिली.