आ.प्रा.राम शिंदे साहेब यांना माही ,जळगाव , नवसरवाडी, निंबोडी, पाटेवाडी, पाटेगाव गावातून विक्रमी मतदान देण्याचा ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कुरुळे व बाबासाहेब बामणे यांचा निर्धार 

Google search engine

माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हेच खरे विकासपुत्र असून आ.राम शिंदे साहेब यांना माही ,जळगाव , नवसरवाडी, निंबोडी, पाटेवाडी, पाटेगाव गावातून विक्रमी मतदान होणार असा निर्धार ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कुरुळे व भाजप नेते बाबासाहेब बामणे यांनी व्यक्त केला आहे .विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.

यावेळी श्री लाड मेजर , सुदाम जाधव , आजिनाथ भवर , दीपक सोंडगे , कांतीलाल लाड , दादा गरड , बापूराव काळे , सोमनाथ मते , बाळासाहेब निंबोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ग्रामपंचायात सदस्य नवनाथ कुरुळे व भाजप नेते बाबासाहेब बामणे म्हणाले की माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. माही, जळगाव हा भाग अवर्षण ग्रस्त भाग असून वेळेत सुटलेल्या सिना आवर्तनाने हा भाग बागायती म्हणून ओळखला जावू लागला आहे. जलयुक्त शिवार , रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आ.राम शिंदे साहेब यांच्यासाठी कार्यकर्ते , पदाधिकारी अहोरात्र मेहनत आहेत. तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले.

आमच्या परिसरामधील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम खऱ्या अर्थाने कोट्यवधी रुपयांचा निधी देऊ आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी केले

अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर , आढळगाव जामखेड रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .