
माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेबांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कोकणगाव मधील विकासकामांच्या आधारावर जनतेला जागृत करून मतांचे दोन्ही बूथ वरून लीड देणार असल्याची ग्वाही मा.सरपंच बिबिषण सूर्यवंशी यांनी दिली.
आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी कोकणगाव अंतर्गत संपूर्ण काँक्रीट रस्ते, छत्रपती संभाजी राजे मंगल कार्यालय, जलसंधारण मंत्री असताना जलसंधारणाची कोट्यवधीची कामे केली , नदी खोलीकरण रुंदीकरण व त्या नदीवर तीन किलोमीटर अंतरावर सहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे त्यामुळे कोकणगाव टँकर मुक्त व शेतीला भरपूर पाणी, मंगल कार्यालयासमोर पेव्हींग ब्लॉक, दशक्रिया विधी ओटा व ब्लॉक जलजीवन योजने अंतर्गत संपूर्ण गाव व वाड्या वस्तीवर योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, ज्योतिबावाडी या ठिकाणी अंतर्गत काँक्रीट रस्ते, सभामंडप, कधीही कामासाठी फोन केला की काम करणारा आमदार यामुळे कोकणगाव मधील दोन्हीही बूथ मधून जास्त मताधिक्य देणार असल्याची माहिती त्यांनी दिली . तसेच सुजाण मतदारांनी आ.प्रा.राम शिंदे साहेबांना मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन कोकणगाव चे मा.सरपंच बिबिशन सूर्यवंशी यांनी केले आहे.







