भूमिपुत्र आमदार राम शिंदें साहेबांना विधानसभेची उमेदवारी आज जाहीर होताच भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका किसान मोर्चा अध्यक्ष भाजपा गणेश चंद्रभान जंजीरे यांनी जल्लोष व्यक्त करत आ. राम शिंदे साहेब यांच्या विजयाचा संकल्प केला .
यावेळी बोलताना ते म्हणाले , आपला तो आपलाच असतो , भूमिपुत्र आ. राम शिंदे साहेबांनी मंत्री पदात केलेली विकासकामांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळीच ओळख निर्माण झाली.आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील भूमीसाठी गेली २० वर्ष केलेल्या अविरत कार्यामुळे आ. राम शिंदे साहेबांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली.कर्जत जामखेडचा भूमीपुत्र या नात्याने आपल्या भूमीच्या उत्कर्षासाठी कर्जत जामखेड मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.शिंदे

साहेबांसाठी येणारे ३० दिवस वैयक्तिक जनसंपर्क करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.







