
कर्जत तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या टाकळी खंडेश्वरी येथील श्री क्षेत्र स्थापलिंग येथे श्रीमंत दगडु शेठ गणपती मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे . या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधी कीर्तनकार ह. भ. प.गोविंद महाराज शिंदे यांच्या शुभ हस्ते उद्या सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता करण्यात येणार आहे.
टाकळी येथील रहिवाशी असलेले व सद्ध्या मुंबई येथे कार्यरत असलेले मुंबई येथील उद्योजक दत्ता सकट हे श्रीमंत दगडु शेठ गणपतीचे निस्सीमभक्त आहेत. याच भक्ती भावनेतून त्यांनी मुंबईवरून खास श्रीमंत दगडु शेठ हलवाई गणपतीची मूर्ती स्वखर्चातून बनवून आणली आहे.त्या गणेश मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा विधी उद्या संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी टाकळी खंडेश्वरी सह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्योजक दत्ता सकट यांनी केले आहे.







