आ.रोहित दादा पवार ५० हजार पेक्षा जास्त मतांनी पुन्हा विजयी होतील : सचिन निंबोरे

Google search engine

 

कर्जत जामखेड मधील सर्वसामान्य जनता व विकासकाम रुपी आशीर्वादामुळे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड मतदार संघात २०१९ पेक्षा मोठे मत्ताधिक्य घेवून विजयी होतील अशी प्रतिक्रिया सचिन निंबोरे यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी वार्तालाप केला. यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार हेच खरे मतदार संघाचे भूमिपुत्र आहेत. कर्जत जामखेड मतदार संघात गेल्या पाच वर्षात आरोग्य , शिक्षण , महिला आणि बालविकास ,सामाजिक उपक्रम, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, वीज , पाणी,नागरी सुविधा , कृषी व जलसंधारण , कुकडी व सिना नियमित आवर्तन , राष्ट्रीय महामार्ग, पाणंद रस्ते, सायकल वाटप, शालेय साहित्य वाटप, बचत गट,आदी केलेल्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरणार आहेत. अनेक वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण केली. आ.रोहित पवार हे मोठ्या मताधिक्यांनी यावेळी निवडून येतील यात कोणतीही शंका नसेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आ.रोहित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांचावर आघाडीच्या अनेक नेत्यांच्या प्रचारांची जबाबदारी असणार आहे.

गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे जायंट किलर ठरले .त्यानंतर या मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली .अनेक वर्षापासूनची सर्वसामान्य जनतेची प्रश्न निकाली काढले. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर त्यांनी संघर्षाची भूमिका घेत ईडी व इतर दबावतंत्रापुढे न झुकता लढाऊ वृत्ती जपत स्वाभिमानी बाणा जपला .पक्ष फुटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी निष्ठा न बदलता जाणता राजा शरदचंद्र पवार साहेब यांच्या बरोबर राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. युवकांना आ .रोहीतदादांबद्दल कर्जत जामखेड मधील जनतेला प्रंचड आत्मविश्वास आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.