
कर्जत तालुका प्रतिनिधी :- श्री.अशोक सूर्यवंशी
सध्या सुरू असलेल्या सन २०२४ च्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमधून कु. कोमल सोमीनाथ गोपाळघरे हीची शासकीय ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी एमबीबीएस साठी निवड झाली आहे.
कु. कोमल ही पंचायत समिती शिक्षण विभाग,कर्जत येथे कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटर श्री सोमीनाथ गोपाळघरे यांची कन्या आहे. खडतर परिश्रम आणि अभ्यासातील चिकाटीच्या जोरावर तिने नीट परीक्षेत ६६९ गुण मिळवून पहिल्याच फेरीत मुंबईतील नामांकित शासकीय ग्रँड मेडिकल कॉलेज अर्थात जे. जे. हॉस्पिटल येथे सहजपणे प्रवेश मिळवला.
तिचे प्राथमिक शिक्षण यशवंत प्राथमिक शाळा कर्जत येथे , माध्यमिक शिक्षण सौ. सो. ना. सोनमाळी विद्यालय कर्जत येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण सद्गुरु उच्च माध्यमिक कन्या विद्यालय कर्जत येथे झाले.
एका डाटा एन्ट्री ऑपरेटर च्या मुलीने एमबीबीएस साठी प्रवेश मिळवणे ही गोष्ट सामान्य कुटुंबातून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी प्रेरणादायी आहे. कोमलच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिच्या या एमबीबीएस प्रवेशाबद्दल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी प्रदीप शिंदे साहेब, सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय तज्ञ,कर्मचारी वृंद, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समस्त शिक्षक बांधवांनी अभिनंदन करून तिच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.







