
रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत २३ ऑगस्ट हा दिवस ‘अवकाश दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन भौतिकशास्त्र करण्यात आले होते. याप्रसंगी ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपट विद्यार्थ्यांकरिता दाखविण्यात आला
भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी चांद्रयानाची प्रतिकृती तयार केली होती. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. दत्ता शेंडे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. शेंडे यांनी विद्यार्थ्यांना अवकाश दिनाचा उद्देश व महत्त्व पटवून सांगितले. कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश भदाणे यांनी तर आभार विज्ञान विभागाचे उपप्राचार्य व भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ठुबे यांनी मानले. याप्रसंगी भौतिकशास्त्र व इतर विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







