साईकृपा कृषि महाविद्यालयाच्या २०१६ बॅच च्या विद्यार्थ्यांनीची बीड येथे सरकारी नोकरीसाठी निवड

Google search engine

 

साईकृपा कृषि महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. गाडगे मोनिका संजय हिची संभाजीनगर जलसंपदा विभाग अंतर्गत जिल्हा बीड येथे कालवा निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. कु. मोनिका गाडगे ही  खुंटेफळ ता. शेवगाव जि. अहमदनगर येथील रहिवाशी असून अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातून असून खडतर प्रयत्नाने यश मिळवले हिचे वडील शेतकरी व आई गृहिणी असून अतिशय कष्टातून त्यांनी मुलिस शिकविले. कु. मोनिका हि कृषि महाविद्यालयाची २०१६ बॅच ची विद्यार्थिनी आहे. २०२० मध्ये B.Sc. Agri. (Hon.) डिग्री मिळवल्या नंतर स्पर्धा परीक्षा देऊन यश संपादन केले आहे.

या यशात साईकृपा कृषि महाविद्यालयाचे सर्व स्टाफचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. याकामी प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेच्या सचिव सौ.अर्चना पानसरे मॅडम व महाविद्यालयाचा सर्व स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पानसरे साहेब यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे रजिस्टार कल्याण शिंदे सर व शिक्षेकत्तेर कर्मचारी खोटे सर, जराड सर उपस्थित होते.